वडले ता. फलटण येथील काळेवस्ती श्री शिवअवतारी संत सद्गुरू बाळूमामा व मेंढीमाऊली, श्रीगुरू दत्तात्रेय व मारुती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे 2 ते 4 सप्टेंबर रोजी आयोजन
(जावली /अजिंक्य आढाव): काळेवस्ती, वडले, ता. फलटण, येथे श्री शिवअवतारी संत सद्गुरू बाळूमामा व मेंढीमाऊली, श्रीगुरू दत्तात्रेय व मारुती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा बुधवार दि. २ सप्टेंबर ते शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात होणार आहे.
स्थळ : काळेवस्ती, वडले, ता. फलटण, जि. सातारा
आयोजक : शिवअवतारी संत सद्गुरू बाळूमामा व मेंढी माऊली समाधी मंदिर सेवेकरी, काळेवस्ती, पंचक्रोशी वडले.
सोहळ्याच्या कार्यक्रमानुसार बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी बग्गा नं. ४ चे आगमन सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी श्रींची मिरवणूक व धान्य निवास आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता कलशारोहण होईल. तसेच दुपारी १२.०५ मिनिटांनी वालुग व हेडाम खेळ, तर दुपारी १२.४५ मिनिटांनी भाकणूक होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी पंच कारभारी पुजारी व मेंढके – बग्गा १ ते १९ देवालय, आदमापूर, तसेच भिखुमामा शिंगनारे, सिद्धाप्पामामा सुरनवर (पंच कारभारी देवालय, आदमापूर) आणि आप्पांना पुजारी, श्री हालसिद्धनाथ देवालय, आप्पाचीवाडी यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत.
सोहळ्यास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.