(फलटण/ प्रतिनिधी ): रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याला रोटरी क्लब ऑफ कल्याण, RID 3142 चे माजी अध्यक्ष Rtn. ER. राम मराठे यांनी गुरुवार, दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी रोटरी परंपरेनुसार Rotary Flag Exchange करण्यात आला.
या भेटीदरम्यान रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक तसेच समाजोपयोगी उपक्रमांची माहिती राम मराठे यांनी जाणून घेतली. क्लबच्या सामाजिक कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच भविष्यात रोटरीच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याचे अध्यक्ष रो. डॉ. महेश बर्वे, सचिव रो. डॉ. सुधीर इंगळे, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन रणजित बर्गे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रोटरी परिवारातील अशा सदिच्छा भेटींमुळे परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासोबतच सामाजिक कार्यासाठी नवीन कल्पना व उपक्रमांना प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ फलटण तालुक्याच्या वतीने Rtn. ER. राम मराठे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले