filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 0; shaking: 0.005363; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0000,0.0000; brp_del_sen: 0.1000,0.0000; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;zeissColor: bright;
(जावली /अजिंक्य आढाव )जावली ता. फलटण गावातील वाढत्या पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काशीनाथ शेवते यांनी केली आहे. केवळ वाड्या-वस्त्यांपुरता नव्हे, तर संपूर्ण गावाच्या पाणीप्रश्नाकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

गावातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे, उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेणे, पाण्याचे स्रोत सक्षम करणे आणि आगामी महिन्यांतील संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच नियोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामसेविकेने लघु पाटबंधारे विभागाला दिलेल्या पत्राची माहितीही दाखविण्यात आली. मात्र, पत्रव्यवहारापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर तोडगा म्हणून शासनाकडून ज्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पाणी आहे ती विहीर अधिग्रहण करून पाणी प्रश्न सोडवण्याचे कामकाज केले जाते यासाठी गावातील किशोर मोरे यांच्या विहिरीबाबत चर्चा करण्यात आली व विहीर अधिग्रहण करण्यासंदर्भात बोलणे झाले.
तहान लागल्यावरच आड खांदणार” का अशी परिस्थिती ग्रामपंचायतची आहे. मी पाणी देण्यास सक्षम असून गावातील पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहण कराव्यात – किशोर मोरे
गावातील प्रत्येक वाडी-वस्तीला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर तातडीने बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी काशीनाथ शेवते यांनी केली आहे. या ग्रामसभेच्या वेळी रामचंद्र गावडे, माऊली चवरे, अभिजीत कदम,सत्यवान चवरे, बबलू रजपूत, नाथा साळुंखे, दादा नाळे, रामदास पोकळे, ज्ञानदेव बुधावले,पंकज गुरव, निंबाळकर, नाळे आदी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते
ऐन पाणीटंचाईच्या काळात धावपळ करण्यापेक्षा आताच नियोजन करा; जावलीच्या पाणीप्रश्नाकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करू नये, असा स्पष्ट इशारा या मागणीतून देण्यात आला आहे.