(फलटण /प्रतिनिधी ): फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पप्पूभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, दिव्यांग मुलांना खाऊ वाटप, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना खाऊ वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपली.वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या विविध सामाजिक उपक्रमांतून पर्यावरण संवर्धन, सामाजिक सेवा आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरला.
त्याच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती तथा आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, युवा नेते तथा फलटण नगर परिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे ना.निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे ना.निंबाळकर,नितिन भोसले, दादासाहेब चोरमले, भाऊसाहेब कापसे, इ.मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या .