(फलटण/ प्रतिनिधी) – फलटणचे माझी उपविभागीय दंडाधिकारी डेप्युटी कलेक्टर तथा कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेले मा.श्री. सचिन ढोले पाटील यांची रायगड अपर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वच स्तरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.महाराष्ट्र राज्य शासनाने 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामध्ये सचिन ढोले यांचा समावेश आहे.
मात्र यापूर्वीचदि. २३ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उपनगरच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर रायगड सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
फलटण तालुक्यात कार्यक्षम अधिकारी म्हणून सचिन ढोले यांची ओळख
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून बदली करण्यात आली होती.फलटण येथे प्रांताधिकारी म्हणून काम करीत असताना तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी गरीब वंचित दिव्यांग त्यांची कार्यालय सात त्याने करण्यात खुले असायचे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना असे वाटू लागले होते की हे कार्यालय आपले कार्यालयात आहे या कार्यालयामधून आपले सर्वसामान्य प्रश्न सुटत आहे यासाठी कुठे लाच द्यावी लागत नाही.
जवळपास सकाळी ९ आणि रात्री ८ वाजेपर्यंत सचिन ढोले हे आपल्या कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम बसून असायचे तालुक्यात यापूर्वी असा अधिकारी तालुक्याला लाभला नव्हता त्यांच्या कार्य काळामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात लोकसभा विधानसभेची निवडणूक पारदर्शकपणे पार पडली त्यांच्या कामकाजाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सचिन ढोले यांचा विशेष गौरवही केला.
त्यांनी यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
रायगडच्या विकासाला नवी दिशा
आपल्या कर्तृत्वाला, प्रशासनिक अनुभवाला आणि कार्यक्षम नेतृत्वाला मिळालेली ही नवी जबाबदारी निश्चितच रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल. रायगड जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग येथे असून जिल्ह्याच्या महसूल प्रशासनातील हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते.