(जावली/ अजिंक्य आढाव ): श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जावली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावता माळी तरुण मंडळ, जावली यांच्या वतीने मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर श्री संत सावता माळी मंदिर, जावली येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदात्यांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून, सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिराचे आयोजन महेश नाळे, विशाल नाळे व दादा नाळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, सावता माळी तरुण मंडळ यांच्याकडून शिबिराची तयारी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.