(जावली /अजिंक्य आढाव )फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण गावचे हद्दीत हॉटेल बांगणगा नदी च्या बाजूला संशयीत इसम रस्त्यावरिल येणारे जाणारे लोकांना लुटणार असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मा. राजकुमार भुजबळ, पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटिकरण पथक सदर ठिकाणी गेल्यावर ०५ संशयीत आरोपी दिसून आले. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच पळून गेले. त्यावेळी पोलीस पथकाने ०२ किलोमिटर पाठलाग करून ०५ आरोपीपैकी दोन आरोपींना उसाचे शेतामधून व कुरवलीच्या तलावाजवळून मोठ्या शिताफीने पाठलाग ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीच्यांकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापर करण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींच्याकडून ग्रामीण भागातील ब-याच चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्याप्रमाणे अधिक तपास चालू आहे.
आरोपी १. राहुल नाना घुले.रा,इंदिरानगर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा, २. नंदकुमार भागोजी सोनवणे, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक केली असून ०३ आरोपी फरार आहेत. सदर आरोपींच्या विरुध्द फलटण ग्रामीण स्टेशन गु.र.नंबर-४८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३९०(४)(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फरारी आरोपींना पकडल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. निखिल पिंगळे सो., पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो.अपर पोलीस अधीक्षक, मा. धन्यकुमार गोडसे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सुचनांनुसार पोलीस निरीक्षक मा. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ, सहा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.