भर बाजारात पथदिवा कोसळला ; दोन ते तीन भाजी विक्रेते जखमी — पालखी मार्गावरील विद्युत रोषणाईच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली आणि संदीप चोरमले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह त्यांनी पडलेला खांब हटविणे, परिसर सुरक्षित करणे, वाहतूक सुरळीत करणे आणि जखमींना मदत करण्याचे काम तातडीने हाती घेतले. घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.