(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी म्हणजे कु. आद्विका अतुल गरगडे हिने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र स्टेट थाईबॉक्सिंग सिलेक्शन कॉम्पिटिशन २०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेत १० ते १२ वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लहान वयातच कठोर सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आद्विकाने हे यश संपादन केले असून तिच्या या कामगिरीने कुटुंबीय, प्रशिक्षक, शाळा तसेच संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे. राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल करणारी आद्विका अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आद्विकाच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ती आणखी उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.