साखरवाडी (ता. फलटण), दि. 26 जुलै : साखरवाडी येथील 14 वर्षीय संकल्प संदीप रुपनवर हा मुलगा रविवारी (दि. 26 जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला असून, त्यानंतर तो अद्यापपर्यंत घरी परतलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संकल्प संदीप रुपनवर (वय 14 वर्षे), रा. गणेश नगर, विद्यमान मंगल कार्यालयाशेजारी, साखरवाडी (ता. फलटण) हा रविवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता घरातून निघून गेला. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.
या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे दिसल्यास तात्काळ त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
विद्या संदीप रुपनवर
📞 98 90 020408