(जावली /अजिंक्य आढाव ): वाखरी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस तथा फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रामभाऊ ढेकळे पाटील यांच्या सौजन्याने हा प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम संपन्न झाला
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास फलटण विधानसभेचे आमदार श्री. सचिन पाटील, महानंद दूध डेरीचे माजी व्हाईस चेअरमन श्री. डी. के. पवार (अण्णा), राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष श्री. मनोज देशमुख, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अक्षता ढेकळे पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष श्री. अतुल शहा, श्री. विकास राऊत, माजी चेअरमन श्री. दादा पाटील, माजी सरपंच श्री. जगन्नाथ जाधव, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. दादासो गरड, पै. दिगंबर जाधव, श्री. कृष्णात कुंभार गुरुजी, श्री. स. रा. मोहिते गुरुजी, श्री. पंढरीनाथ धायगुडे, श्री. दत्तात्रय मोहिते, डॉ. गणेश धायगुडे, श्री. आबा मोहिते, श्री. आप्पासो ढेकळे, श्री. विलास गरड, श्री. राजेंद्र ढेकळे, श्री. अनिल सूर्यवंशी, श्री. जोतिराम बनकर, श्री. मुगटराव ढेकळे, श्री. बाबूराव ढेकळे, श्री. संतोष गरड, श्री. राजाभाऊ तांबे, श्री. शिवाजीराव ढेकळे, श्री. राकेश जाधव, श्री. संभाजी ढेकळे, श्री. अक्षय जाधव, श्री. राजाभाऊ सुळ, श्री. दशरथ राऊत, श्री. माणिकराव ढेकळे, श्री. सोनबा कुंभार, श्री. मेघनाथ ढेकळे, श्री. बाळासाहेब जाधव (फौजी), श्री. केतन ढेकळे, श्री. तानाजी आवटे, श्री. चंद्रकांत गायकवाड, श्री. जयसिंग गरड, श्री. सतीश ढेकळे, श्री. नितीन गायकवाड, श्री. बुवासो राऊत, श्री. अमोल जाधव, श्री. अमर काटकर, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. गणपत जाधव, श्री. वसंत गायकवाड, श्री. सतीश ढेकळे, श्री. जाधव तसेच श्री. अशोक काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व आदरणीय शिक्षकवृंद, वाखरी गावातील समस्त ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती वाखरीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच चि. सौरभ ढेकळे, अभिषेक ढेकळे, अजिंक्य ढेकळे, सागर जाधव, विनय गरड, प्रशांत जाधव, प्रथमेश गरड, सुमित गरड, प्रज्वल धोंगडे यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला असून, उपस्थितांनी श्री. रामभाऊ ढेकळे पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.