(जावली /अजिंक्य आढाव)- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ वैशाली ताईनी जावली गावाला भेट देऊन मतदार बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त केले.
बरड जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत शिवसेना व राजे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे. सामाजिक कार्य व शिक्षण क्षेत्रातील भक्कम कामगिरीच्या जोरावर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत ही निवडणूक जिंकली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गटात सौ. वैशालीताई कांबळे यांनी पहिले फेरीपासूनच आघाडी वर होत्या . मतमोजणीअंती त्यांचा विजय घोषित होताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
निंबळक (ता. फलटण) येथील रहिवासी असलेल्या सौ. वैशालीताई कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून मालोजीराजे शेती विद्यालयात त्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील विकास या क्षेत्रांतील त्यांच्या कार्याला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला आहे.
विजयानंतर बोलताना सौ. वैशालीताई कांबळे म्हणाल्या,“हा विजय माझा नसून बरड गटातील जनतेचा आहे. समाजातील वंचित घटकांचा विकास, दर्जेदार शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन.”
यावेळी शिवसेना व राजे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विजयानंतर बरड जिल्हा परिषद गटात नव्या आणि प्रभावी नेतृत्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.बरड जिल्हा परिषद गटातील गावागावांमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानण्याचे काम वैशाली कांबळे मॅडम करत आहेत. दरम्यान जावली येथे आले असता सर्व मतदारांचे आभार मानून विश्वासास पात्र ठरवून जनतेने दिलेले भरघोश मतदान स्वरूपातील आशीर्वाद यापुढे कामकाजाच्या स्वरूपातून मी परत करेण त्या आभार मानताना बोलत होत्या. या वेळी जावली गावातील अभिजीत मकर,समीर आतार, संग्राम बरकडे, राहुल निंबाळकर, सयाजी बरकडे, आनंदराव निंबाळकर, श्रीरंग निंबाळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते