आपला जिल्हा

फलटण नगरपरिषेद प्रभाग क्रमांक 11 मधून दादासाहेब चोरमले अर्ज दाखल

(फलटण /प्रतिनिधी) फलटण नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 11(नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधुन कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी एकनाथ शिंदे पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे.
शैक्षणिक, सामाजिक राजकीय, क्रिडा क्षेत्रात सक्रिय सहभाग देत दादासाहेब चोरमले हे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच सातारा जिल्हा  खो-खो असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसह शहराच्या सार्वजनिक जीवनात विशेष ओळख निर्माण केलेली व्यक्ती आहेत .

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय, सामाजिक जीवनामध्ये कार्यरत आहेत.
मागील नरपरिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ.वैशाली चोरमले जिल्हा स्तरावर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्यने विजय मिळवून चोरमले दांपत्यांची लोकप्रियता अधोरेखित केली होती.त्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 9 मधुन विविध विकास कामांना प्राधान्य देत चेहरा मोहरा बदलला होता.असे नागरिक प्रतिक्रिया देत आहेत.

वीस कोटींची विकासकामे प्रभागाला दिली
सौ.वैशाली चोरमले यांनी नगरसेवक म्हणून काम करताना नागरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या नवीन लाईन,गटार पाईपलाइन, भूमिगत गटारे योजना, समाज मंदिरे , अत्याधुनिक जिमची उभारणी प्रत्येक भागात सिमेंट क्राॅक्रेंटी करणाचे रस्ते, 20 कोटी रुपयांची विकासकामे केल्यामुळे कार्यक्षम नेतृत्व म्हणून फलटण शहरात ओळखले जातात.

प्रभाग 11 मधून‌ त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल होताच स्थानिक राजकारणात विकासभिमुख म्हणून प्रतिनिधित्व ओळखले जाणारे दादासाहेब चोरमले यांना शहरात उत्सुकत व उमेदवारीकडे शहरवासियांची नजर लागली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!