ताज्या घडामोडी
जवानाच्या पत्नीचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण – पारिजातका जगताप


मौजे ढवळ येथील सुपुत्र आयु. विकास गायकवाड हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून राष्ट्रसेवेच्या कर्तव्यासाठी त्यांना अनेकदा कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा परिस्थितीत पत्नी म्हणून आयुनि सोनाली गायकवाड या घरातील ज्येष्ठांचा सन्मान राखत, कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. सैनिकाच्या पत्नीचे जीवन हे केवळ प्रतीक्षेचे नसून त्यात कर्तव्य, त्याग, संघर्ष, संयम आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. अनेक कौटुंबिक समारंभ, आनंदाचे क्षण आणि कौटुंबिक निर्णय सैनिकांच्या अनुपस्थितीत सांभाळताना त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते; मात्र त्या न डगमगता संपूर्ण कुटुंबाचा भार समर्थपणे पेलत असतात.
यावेळी शुभेच्छा देताना आयुनि पारिजातिका जगताप म्हणाल्या, “सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या जवानाच्या पत्नीचे जीवन हे त्याग, समर्पण आणि जबाबदारीचे मूर्तिमंत उदाहरण असते. सैनिक देशाचे रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबाचे रक्षण, संगोपन आणि व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी पत्नीवर येते. आयुनि सोनाली गायकवाड या अत्यंत संयमी, मितभाषी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आहेत. आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी जपत त्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.”Lorem ipsum dolor sit amet, consectetur.