ताज्या घडामोडी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिर्के सर यांनी उपस्थित योगगुरू श्री. अनिल एकनाथ गोसावी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री. सावंत सर यांनी प्रास्ताविकातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले.
श्री. सावंत सर म्हणाले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य जीवनशैली आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारे विज्ञान आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढणारा ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर यामुळे निर्माण होणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग हा प्रभावी उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक व सुदृढ राहते, एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो तसेच मानसिक शांतता प्राप्त होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.