आपला जिल्हा

शहीद जवान देविदास रजपूत यांच्या आई यांना रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वतीने दिला ध्वजारोहणाचा मान

(जावली /अजिंक्य आढाव)-देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदाला श्रद्धांजली व सन्मान देण्याचा एक वेगळा उपक्रम जावली ता.फलटण येथील रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली यांच्यावतीने शहिद जवान देविदास रजपूत यांच्या आई लता रजपूत, पत्नी श्रीमती अमृता देविदास रजपूत यांना हस्ते ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या वेळी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण व ध्वजवंदन आयोजित कार्यक्रमात अत्यंत गौरव पूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

सातारा जिल्ह्यातील प्रथमच या इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये वेगळा उपक्रम राबवण्यात आला. देशभक्तीचा नवा आदर्श निर्माण करून दिला आहे.

या कार्यक्रमावेळी शाळेच्या वतीने कवायत प्रकार विद्यार्थ्यांची भाषणे शहीद कुटुंबाचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री.दशरथ चवरे, संस्थेचे सचिव प्रा. अमोल चवरे सर, प्राचार्या सौ कांचन चवरे मॅडम, सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!