आपला जिल्हा

स्विकृत नगरसेवक पदासाठी लागणारी पात्रता नीट तपासा अन्यथा हायकोर्टात जाणार – शिवसेना

(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण नगरपरिषद फलटणच्या उपनगराध्यक्ष पदाच्या व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची घोषणा उद्या होणार आहे.स्वीकृत नगरसेवक पदासाठी लागणारी जी पात्रता आहे व या निवडीसाठी लागणारी कागदपत्रे तपासणीचा कार्यक्रम सध्या फलटण येथील उपविभागीय कार्यालयामध्ये सुरू आहे.

या पदासाठी लागणारी पात्रता संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे तपासावी या पात्रतेमध्ये एखादी त्रुटी असून देखील जर कोणाचे नाम निर्देशन पत्र स्वीकारून स्वीकृत पदासाठी अर्ज मंजूर करण्याचे षडयंत्र चालू असल्याचे समजत आहे. जर अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी चुकीचे नामनिर्देशन पत्र मंजूर केले तर तर फलटण तालुका व शहर शिवसेना हायकोर्टात या निवडीला दाद मागणार असल्याची माहिती नाव न घेण्याच्या अटीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.सध्या फलटण तालुक्यातील सर्व अधिकारी हे एकाच पक्षाचे मांडलिक असल्याचे वागत असल्याचे दिसून येत आहे.
खरंतर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये काम करत असलेला शासकीय अधिकारी यांनी निरपेक्ष पणे कामकाज करणे अपेक्षित असते परंतु सध्या हे फलटण शहरात व तालुक्यात होताना दिसत नाही असा अनेक लोकांना अनुभव आल्याचे दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर निकष डावलून कोणी जर स्वीकृत नगरसेवक होणार असेल तर त्याविरुद्ध निश्चितपणे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क करून शिवसेनेचे पदाधिकारी हायकोर्टात जाणार असून संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!