(फलटण /प्रतिनिधी)- श्रीमंत रामराजे यांनी गेल्या 30 वर्षांमध्ये फलटण शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करून जलक्रांती औद्योगिक क्रांती व शैक्षणिक क्रांती केली असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते पाणी प्रश्न व विविध विकास प्रकल्पाच्या वाटचालीचा दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी केले आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे ते म्हणाले की, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाटचाली पाहताना असा एकेक धागा वेगवेगळ्या जिल्ह्यांशी, तालुक्यातील पाणीप्रश्नी, पुनर्वसन व सर्व पक्षीय कार्यकर्ते , सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेले कर्तृत्व व मदतकार्यातून अनेक वाडी वस्ती, गावा गावात डोंगरदर्या वरील दहा घरांची वस्ती जरी असली तरी तिथं आपले पणाचे कौटुंबिक नाती न तुटणारे जिव्हाळेचे हितसंबंध संबंध निर्माण करुन मिळालेल्या राजकीय संधीचे सोने केले आहे व पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी संघर्षाचे मुख्य होकायंत्र व प. महाराष्ट्र राजकीय विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेच मात्र अनेक राज्यांतील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, जनतेच्या दरबारात व महाराष्ट्र राज्यातील जनता जनार्दन त्यांच्या कडे एक भगिरथ व जलनायक म्हणून आजही पाहतोय असे सांगून पुढे मोरे म्हणतात श्रीमंत रामराजे यांची राजकीय कारकीर्द आत्ता चार दशकांचा माईलस्टोन पार करून पाच दशकांचा ऐतिहासिक प्रवास चांदया पासून ते बाद्या पर्यंत राजकारण व समाजकारण चा सफर राफेल विमानाच्या गतीने पुढे सरसावत आहे…!
महाराज साहेबांच्या जडणघडणी मध्ये अनेक सर्वपक्षीय मान्यवर नेते मंडळी सह अनेकांचे कौटुंबिक संबंध आहेत विशेषतः आजही पवार कुटुंबातील सर्वाशी आपुलकीचे संबंध आहेत हे नाकारता येणार नाही.
आजउद्या जरी महाराज साहेबांनी कोणाला शब्द टाकला तरी दस्तऐवजाला अधिकृत संकेतस्थळावरून लोकमान्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही , मात्र काही दृष्टीहिन मंडळी व्यक्तीदेवषाने वैफल्यग्रस्त आहेत, काही गोरे असले तरी त्यांचे धंदे काळे आहेत त्याला काय करायचे त्याला कोणतेच रामबाण औषध लागू होत नाही, हेच तर खरं महाराजांच्या लोकभावनेचे लोकभवनाचे लाॅजिक आहे म्हणून आजमितीस सुध्दा त्यांची मॅजिकची पारदर्शकता निदर्शनास येत आहे.
मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय राजकारणातील समृद्धीचा मार्गाला हिरवा कंदील मिळाला होता मात्र अनेक शिवरात व वाडी वस्ती वर पाणी खळखळल्या शिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही हा दृष्टिकोन व दृढनिश्चय केल्याने थांबले असावेत.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर ( अहिल्यानगर) या सहा जिल्ह्यात पाणी प्रश्नावरील अनेक प्रकल्पांना गती मिळाली ती महाराज साहेबांच्या माध्यमातुन म्हणून तर त्या भागात त्यांना मानणारा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात आहे.
मा. शरद पवार यांच्या राजकारणाचे किस्से महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय विषयांवरील कोणतीही चर्चा पवारांशी संबंधित किस्साशिवाय रंगत नाही.निवडणुकी च्या काळात पवार एकाला कामाला लागायला सांगतात आणि दुसर्यांला उमेदवारी देतात,एकाचा प्रचार करतात आणि दुसर्यांला निवडून आणण्याचा प्रयत्न करतात अशा काही वास्तवातल्या काही काल्पनिक गोष्टी सतत चर्चेत असतात. राजकारण हा मराठी माणसाचा आवडता विषय. पारा वरच्या, कट्टा या वरच्या गप्पांमध्ये शह- काटशहा च्या राजकारणावर विशेष भर असतो. काही नाट्यमय, धक्कातंत्राचा अवलंब असलेल्या, कल्पना पलिकडचे विश्व तिथं अवतरत असते, त्यामुळे स्वाभाविकच मा.शरद पवार साहेब यांच्याशी संबंधित अनेक खरया खोट्या गोष्टी प्राधान्याने असतात तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत काही मंडळी बेताल वक्तव्य करीत आहेत मात्र त्यांनी अगोदर स्वतःकडे पहावी आणि नंतरच रामराजे यांच्यावर टीका टिप्पणी करावी असे शेवटी मोरे म्हणाले आहेत.