क्रीडा व मनोरंजन
मुधोजी महाविद्यालयात एकदिवसीय विज्ञान – तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित “नॅक ए प्लस” मानांकन प्राप्त मुधोजी महाविद्यालय फलटण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उद्यानमुख शाश्वतीचा मार्ग (EHST-2026)- या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
विज्ञान-तंत्रज्ञान चे उपयोग शाळेपुढे मला देत न राहता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडले पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर संशोधन करण्याचे स्वप्न पहावे व आंतरराष्ट्रीय संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
डॉ.सागर डेळेकर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते बोलत होते की शाश्वत विकासासाठी पर्यावरण समतोल ठेवणारे तंत्रज्ञाने विकसित करणे व औद्योगिक क्षेत्रासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शाश्वत विकासावर भर देणे हे उद्दिष्ट ठेवून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधनात वर भर देणे असे आपले मत कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
या परिषदेत सिंगापूर डॉ घोलप व साऊथ कोरिया डॉ धीरज पी मुरळे, डॉ पाटील नामवंत संशोधक व वैज्ञानिक उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना संशोधनातील संशोधनात्मक मार्गदर्शन करत जागतिक स्तरावरील नवीन संधी नवीन दिशा याबाबत मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक संशोधन कशा पद्धतीने शोधता येईल याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य पीएच कदम यांनी विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कार्यशाळा उपयुक्त ठरेल व कार्यशाळेच्या माध्यमातून विज्ञान विषयाची देवाण -घेवाण होईल. यासाठी महाविद्यालय पूर्णपणे प्रयत्न करेल. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी परिषदेचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील महत्त्व आधारित केले उद्घाटन समारंभाला (IQAC)- समन्वय प्रा. टी.पी शिंदे उपस्थित होते.
परिषदेत आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानातील विविध विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत एकूण २५० संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांनी संशोधन पेपरचे वाचन, प्रकाशन व पोस्टर प्रेसेंटेशन द्वारे सहभाग नोंदविला. काही विद्यार्थ्यांनी ओरल प्रेझेंटेशन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.



