आपला जिल्हा

मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात हिवाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

(फलटण/प्रतिनिधी)-मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावी मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि.8 जानेवारी रोजी  रोजी हिवाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हिवाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी रोजी सकाळी 8.30 वा. फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा.श्री. शिवाजी शिवाजीराव घोरपड यांच्या शुभहस्ते होणार आहे. व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉक्टर पी .एच. कदम हे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत.व प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्या प्रा. सौ. यू.एस. भोसले हे असणार आहेत.

या स्पर्धेमध्ये थ्रोबॉल (मुले, मुली), रस्सीखेच, (मुले, मुली), अॅथलेटिक्स (१०० मीटर व ४०० मीटर धावणे), गोळाफेक (मुले-मुली) इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडू यांना ट्रॉफी व मेडल दिले जाणार आहे. सदरच्या हिवाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी कनिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख शेंडगे टी. एम. व खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कनिष्ठ जिमखाना विभाग समितीने केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!