आपला जिल्हा
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड जाहीर


महाराष्ट्र राज्य संघटक (पुणे) व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले, राज्य संघटक विजय ओव्हाळ, राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोहिते, जिल्हा सरचिटणीस सुनिल कदम, संस्कार विभाग उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, हिशोब तपासनीस बाळासाहेब जाधव, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, राज्य हिशोब तपासनीस अरुण गायकवाड, जिल्हा महिला विभागाध्यक्ष सुजाता गायकवाड, फलटण तालुका माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत माण तालुक्यात संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.