आपला जिल्हा

केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी – सुजाता गायकवाड

(शिंगणापूर/ प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य संघटक पुणे तसेच सातारा जिल्हा प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ यांच्या उपस्थितीत व भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे अध्यक्ष नानासो मोहिते व सातारा जिल्हा पूर्व ची सर्व कार्यकारणी यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा सुजाता गायकवाड यांच्या अधिपत्याखाली माण तालुका महिला कार्यकारणीची निवड नुकतीच पार पडली.

माण तालुक्याच्या महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी स्नेहल बनसोडे, सरचिटणीस शितल शिंदे, कोषाध्यक्ष मंगल रणपिसे, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष अंजली सरतापे,संस्कार सचिव सुनिता सरतापे, निलाबाई सरतापे, समता सैनिक दल संरक्षण ज्योती खरात, संघटक नीलम भोसले,विजया भोसले यांची निवड करण्यात आली. याच वेळी शिंगणापूर येथील ग्राम शाखेची स्थापना ही करण्यात आली. ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी सायली भोसले, सरचिटणीस प्रतिज्ञा भोसले, कोषाध्यक्ष ज्योती भोसले, उपाध्यक्ष संस्कार दिपाली भोसले, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन सुनिता भोसले, कार्यालयीन सचिव वैशाली भोसले यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य संघटक पुणे तसेच सातारा जिल्हा प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ,राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड, राज्य हिशोब तपासणीस अरुण गायकवाड, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे अध्यक्ष नानासो मोहिते, सरचिटणीस सुनील कदम, संस्कार उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, हिशोब तपासणीस बाळासाहेब जाधव,संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे व सातारा जिल्हा पूर्व ची सर्व कार्यकारणी, वंचित बहुजन आघाडीचे युवराज भोसले, राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड,फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष शिवाजी सावंत व माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे, सरचिटणीस श्रीमंत भोसले व सर्व कार्यकारिणी व उपस्थित सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना राज्य हिशोब तपासणीस म्हणाले, ” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या या धम्म संस्थेच्या वतीने सुरू असणाऱ्या धम्मकार्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त महिला जोडण्याचा प्रयत्न करूया.”

यावेळी माजी प्राचार्य शिवाजी सावंत सर म्हणाले, “महिला या पुरुषांपेक्षा चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात.धम्म संस्कार देण्यामध्ये त्यांचे योगदान कायम राहिले आहे. संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध शिबिरांमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त महिलांचे संघटन निर्माण करावे.”

उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष आयुनि सुजाता गायकवाड म्हणाल्या, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांचा भारत बुद्धमय करण्याचा संकल्प जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर महिलांनी सक्षमपणे धम्म चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. सातारा जिल्हा पूर्व विभागात एकूण पाच तालुके येतात. या सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी सक्षम करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत असून, प्रत्येक ठिकाणी महिलांची सशक्त तालुका कार्यकारिणी उभी करण्याचा आमचा संकल्प आहे.केवळ पदासाठी नकोत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या, धम्म चळवळीला वाहून घेणाऱ्या महिलांची कार्यकारिणी हवी आहे.

यासाठी उपासिका शिबिरे नियमितपणे घेतली पाहिजेत, जेणेकरून महिलांमध्ये धम्माची समज, आत्मविश्वास आणि संघटनशक्ती वाढेल. यापूर्वी स्थापन केलेल्या महिला कार्यकारिणी फलटण, खटाव आणि कोरेगाव येथे यशस्वीपणे धम्माचे काम करत आहेत.”कार्यकारिणी निवड धम्म सभेची सांगता सरणंतंय घेऊन झाली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!