ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) नूतन कार्यकारिणी सत्कार व मासिक बैठक संपन्न

(कोळकी : प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सत्कार व नवीन कार्यकारिणीची पहिली मासिक बैठक शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीस माण, फलटण, कोरेगाव व खटाव तालुक्यांतील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या नूतन कार्यकारिणीचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, सूर्यपुत्र, बौद्धाचार्यांचे जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त येत्या काळात भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून राज्य संघटक तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले आणि राज्य संघटक विजय ओव्हाळ उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विजय ओव्हाळ म्हणाले की, “भारतीय बौद्ध महासभा ही व्यक्तिकेंद्री नसून समाजकेंद्री संघटना आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरून संघटनात्मक एकात्मतेने काम करणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय वैयक्तिक नसून तो संपूर्ण संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक निर्णयातूनच घेतला गेला पाहिजे. महासभेतील प्रत्येक पदाला समान प्रतिष्ठा असून पदापेक्षा महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवरील आदेश राजशिष्टाचार समजून सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची गरिमा राखून सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. अध्यक्षपद स्वीकारताना जबाबदाऱ्यांसोबत अधिक परिश्रम घ्यावे लागतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष हा देखील एक व्यक्तीच असल्याने कधीकधी चुका होऊ शकतात; मात्र त्या समजून घेऊन पुन्हा त्या घडू नयेत यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार केंद्र व राज्य स्तरावरून देण्यात आलेला कृती कार्यक्रम पाचही तालुक्यांत प्रभावीपणे राबवून महिला उपासिका शिबिरे, युवक–युवती शिबिरे तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारे स्टेशनरी साहित्य, धम्मयान कॅलेंडर व इतर साहित्य सर्व पदाधिकाऱ्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने मी स्वतः स्वीकारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत येणाऱ्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर नियोजन व चर्चा करण्यात आली. यामध्ये विवाह संस्कार विधी प्रमाणपत्र, धम्मयान कॅलेंडर, पदाधिकाऱ्यांची बौद्धाचार्यांची आचारसंहिता, याचवेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी फेरनिवड झालेले आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्य संघटक विजय ओव्हाळ व समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) च्या वतीने नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) आयु. दिलीप आबाजी टिळक, उपाध्यक्ष (संरक्षण) आयु. दीपक काकडे, हिशोब तपासणीस आयु. बाळासाहेब जाधव, कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे व आयु. अनिल कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव आयु. आबासाहेब बनसोडे व संतोष खरात, संरक्षण सचिव आयु. राजेंद्र तायडे व आयु. संपत भोसले, संघटक अर्जुन ननावरे, निलेश सपकाळ, सुधाकर शीलवंत, सज्जन खरात, संदीप खरात व उत्तम मस्के यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरचिटणीस अरुण गायकवाड, माजी फलटण तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, शं ज्ञा कांबळे, मा. जिल्हा संघटक कुमार सरतापे, माण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष अरविंद बनसोडे, जिल्ह्याचे मा. प्रचार व पर्यटन सचिव आयु. सुनिल भोसले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. त्यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून आजच्या बैठकीतील विषय व घटक स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!