(फलटण /आस्था टाईम्स वृत्तसेवा)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने फलटण येथील कुमारी स्नेहल मारुती पवार हिची जलसंधारण अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाली आहे.
कुमारी स्नेहल मारुती पवार हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे झाले असून तिने पुणे येथील सिंहगड कॉलेज मधून बी.ई. सिव्हिल ही पदवी धारण केली आहे.
कु.स्नेहल हिचे वडील मारुती जनार्दन पवार यांनी अभियांत्रिकी सेवेमध्ये उच्च पदावर काम केले असून त्यांच्या आई या एक गृहिणी आहेत.कुमारी स्नेहल पवार हिच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.