(फलटण | प्रतिनिधी) फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित चंद्रकांत वेळेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
प्रा. ललित वेळेकर यांनी “A Comparative Study on Investors’ Behaviour Towards Capital Market in Baramati and Indapur Taluka with Pune City” या विषयावर संशोधन पूर्ण केले. विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील संशोधन मार्गदर्शक डॉ. युवराज दत्तात्रय नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या संशोधनाचा ओपन डिफेन्स व्हायव्हा पार पडला. यावेळी बाह्य परीक्षक म्हणून बर्धमान विद्यापीठ, पश्चिम बंगाल येथील प्रा. डॉ. देबाशीष सूर उपस्थित होते, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. शिल्पा वसंत भिडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
प्रा. वेळेकर यांनी संशोधनाच्या माध्यमातून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांची वाटचाल अधिक समृद्ध झाली असून, महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष, प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी प्रा. ललित वेळेकर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनीही त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.