(जावली/ता. फलटण) : जावली ता. फलटण येथील जागृत देवस्थान असलेल्या जावल सिद्धनाथांचे पुजारी जयवंत कृष्णा पवार (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जावली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जयवंत पवार हे जावलीसिद्धनाथांचे पुजारी म्हणून अनेक वर्षांपासून सेवा बजावत होते.
जावल सिद्धनाथांची आख्यायिका व परंपरा यांची त्यांना सखोल माहिती असल्याने भाविकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर होता. मंदिरातील धार्मिक परंपरा जपण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जावल सिद्धनाथ मंदिराच्या सेवेत कार्यरत असलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.