(जावली /अजिंक्य आढाव ): जाई एज्युकेशन सोसायटी, जावलीचे संस्थापक मा. श्री. अमोल दशरथ चवरे यांची राज्यस्तरीय सनक्रिस्टल गुणवगौरव पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
SUNCRYSTAL Social & Educational Foundation, संभाजीनगर, बारामती, जि. पुणे यांच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या भविष्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देणे या कार्याची दखल घेत अमोल चवरे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
“गुणांचा सन्मान केला की प्रेरणा निर्माण होते आणि प्रेरणेतून समाजाची प्रगती घडते,” या विचारातून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा संकल्प असल्याचे अमोल चवरे यांनी सांगितले.
या पुरस्काराचा सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल तथास्तु, बारामती येथे होणार आहे. अमोल चवरे यांच्या निवडीबद्दल जावली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.