(फलटण /प्रतिनिधी) :मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजाला सकारात्मक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिरा प्रवीण नाळे हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत हंकारे यांचे “न समजलेले आई-बाप” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक प्रवीण नाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या व्याख्यानामध्ये पालक, युवक-युवती आणि कुटुंबातील नातेसंबंध यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या जीवनशैलीत पालक आणि मुलांमधील संवाद अधिक प्रभावी कसा होईल, कुटुंबातील नाती अधिक दृढ कशी होतील आणि कुटुंबव्यवस्थेला बळकटी कशी मिळेल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता दत्त मंगल कार्यालय, पुणे–पंढरपूर रोड, विडणी येथे आयोजित करण्यात आला आहे.व्याख्यानामध्ये “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा”, “आई-वडील आणि मुला-मुलींच्या नात्यांचे सामर्थ्य” तसेच “माझी मुलगी, माझा अभिमान” या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
या सामाजिक उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिक, पालक, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक प्रवीण नाळे यांनी केले आहे.