आपला जिल्हा

सातारा जि.प. समाज कल्याण सभापती पदासाठी सौ. वैशाली कांबळे यांच्या नावाची जोरदार मागणी

(जावली / अजिंक्य आढाव) – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बरड जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार सौ वैशाली संदीप कांबळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना समाज कल्याण सभापती पदा साठी संधी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सौ वैशाली कांबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असून त्यांना समाजसेवेची विशेष आवड आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.एस्सी., एम.एड., डी.एस.एम. असे उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजी राजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा , महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी. आमदार दीपक चव्हाण, श्री शरद कणसे संपर्कप्रमुख सातारा जिल्हा, श्री चंद्रकांत जाधव जिल्हा शिवसेनाप्रमुख, श्री रंजीत भोसले जिल्हा शिवसेना प्रमुख, श्री विराज खराडे संपर्कप्रमुख जिल्हा, श्री नानासाहेब इवरे तालुका प्रमुख शिवसेना, श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर माजी सभापती, सौ श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, श्री भोजराज नाईक निंबाळकर, श्री मेघराज नाईक निंबाळकर, श्री शंभूराजे नाईक निंबाळकर, श्री वामनराव यादव माजी पंचायत समिती सदस्य, श्री दत्तात्रय शिंदे संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्री धनंजय कदम चेअरमन निंबळक विविध कार्यकारी सोसायटी, श्री दादासाहेब कापसे माजी चेअरमन, श्री धनंजय पवार चेअरमन फलटण दूध संघ, श्री मारुती सांगळे संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्री जयकुमार इंगळे सरपंच राजुरी व जिल्हा अध्यक्ष युवक , श्री प्रकाश लंगुटे सरपंच बरड, श्री शंभूराज पाटील संचालक कृषी उत्पन्न समिती फलटण, श्री बाबा बरकडे, श्री रंणजीत सोनवलकर, श्री अक्षय सोनवलकर, श्री नानासाहेब काळुखे, श्री महेश सोनवलकर, एडवोकेट अक्षय सोनवलकर, श्री चव्हाण श्री शामराव चव्हाण, श्री अमोल शिंदे सरपंच, श्री राहुल इवरे, श्री कल्याण इवले, श्री हनुमंत गायकवाड, श्री रवींद्र भोसले उपसरपंच, श्री दशरथ सूळ, अक्षय सुळ इत्यादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीमध्ये सहकार्य करण्यात आले
फलटण तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल कांबळे कुटुंबियांनी आभार व्यक्त केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा व जनसंपर्काचा विचार करता सौ वैशाली कांबळे यांना समाज कल्याण सभापती पदासाठी संधी देणे ही योग्य बाब ठरेल, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

कोविड काळात 160 कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिला मेळावे, तसेच वधु वर मेळावे आयोजित करून त्यांनी समाजकार्याची ठोस छाप निर्माण केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देत तरुणांना सक्षम करण्याचे कार्य केले.विविध शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत विनामूल्य पोहोचवण्याचे काम केले आहे. तसेच शासनाच्या असणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवून प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम विनामूल्य केलेले आहे. घटस्फोटीत ,विधवा , व परितक्त्या महिलांकरता स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. संघटित व असंघटित कामगारांच्या करीता उपलब्ध असणाऱ्या सर्व योजना विनामूल्य पोहोचवण्याचे कार्य केले आहे. गरजू लोकांच्या करता वैद्यकीय मदत ,आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण अंतर्गत फलटण तालुक्यातील महिलांकरता विविध प्रकारचे मेळावे घेऊन मागेल त्याला स्वयंरोजगारा करता प्रशिक्षण देण्यात आले आहे. दर रविवारी महिला मेळावा आयोजित करून महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्याकरता मार्गदर्शन करण्यात येते.

फलटण तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल कांबळे कुटुंबियांनी आभार व्यक्त केले असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा व जनसंपर्काचा विचार करता सौ वैशाली कांबळे यांना समाज कल्याण सभापती पदासाठी संधी देणे ही योग्य बाब ठरेल, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!