(जावली/ अजिंक्य आढाव) – जिल्हा परिषद पचायत समिती धुमाशान सध्या सुरु होत असुन सन 2026मध्ये होणाऱ्या निवडणूकासाठी भाजप एकीकडे तर शिवसेना पक्षा माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरु असुन नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे, गेल्या 30/35 वर्षाच्या राजे गटाच्या सत्तेला सुरुंग लावत खासदार गटाने वर्चस्व निर्माण केले आहे. सध्या फलटण तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट तर पचांयत समिती 16 गण असुन कोण वर्चस्व राखणार याकडे लक्ष लागुन राहिले आहे.
फलटण नगरपालिका निवडणूकीत खासदार गट वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीचे धुमशान लवकर सुरु होणार असुन कोण बाजी मारणार यातच आरक्षण सोडत जाहिर करण्यात आले असुन उमेदवार चाचपणी सुरु असुन निवडणूक आयोगा कडून तारखा कधी जाहिर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.
यापूर्वी तालुक्यात सात गट व चौदा गण होते; परंतु आता ती संख्या नऊ गट व १८ गण अशी झाली आहे. या रचनेत बरड, वाठार निंबाळकर व सांगवी या तीन नवीन गटांची निर्मिती झाली आहे. गणांमध्ये जिंती, राजाळे, दुधेबावी व सासवड या चार गणांची नवीन निर्मिती झाली आहे. तर पूर्वीचा गिरवी गट आता राहणार नसून गिरवी गणाचा समावेश कोळकी गटामध्ये झाला आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या गटात पुढीलप्रमाणे गणांचा समावेश असणार आहे. तरडगाव गटात पाडेगाव व तरडगाव गण, साखरवाडी (पिंपळवाडी) गटात साखरवाडी गण व जिंती गण, सांगवी गटात सस्तेवाडी गण व सांगवी गण, विडणी गटात विडणी गण व राजाळे गण, गुणवरे गटात गुणवरे गण व आसू गण, बरड गटात बरड गण व दुधेबावी गण, कोळकी गटात कोळकी गण व गिरवी गण, वाठार निंबाळकर गटात वाठार निं. गण व सुरवडी गण, हिंगणगाव गटात हिंगणगाव गण व सासवड गण यांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, नव्याने जाहीर झालेल्या या रचनेने तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने व लोकप्रतिनिधींना अनेक ठिकाणी चेहरेपालट करावी लागणार आहे.