आपला जिल्हा

कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांचा पराभव सर्वांनाच चकित करणारा ; अशोकराव जाधव यांची अवस्था “गड आला पण सिंह गेला”

(फलटण/ प्रतिनिधी) – नुकताच फलटण नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये अनेक नवखे व चर्चेत नसणारे चेहरे निवडून आले हे जरी खरे असले तरी ज्यांनी नगरपरिषदे मध्ये अनेक वर्ष विरोधी पक्षांमध्ये राहून निवडून येण्याची किमया केली आहे ते फलटण ते फलटण नगरपरिषदेचे माजी जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या गटाची सत्ता आली असली तरी त्यांचा मात्र पराभव झाला असल्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था त्यांच्या गटाची झाली आहे. तसेच त्याचबरोबर सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहून काम करणारे राजे गटाचे कट्टर नेते व नगरपरिषदेची सर्व माहिती असणारे दादासाहेब चोरमले यांचा पराभव तर सर्वांनाच धक्का देणारा ठरला असल्याचे फलटण सर्वत्र चर्चिली जात आहे. अगदी हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या यादीत शंभर टक्के निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये दादासाहेब चोरमले हे निवडून येणार अशीच चर्चा सर्वत्र फलटणभर सुरू होती.

मात्र निकालानंतर त्यांचा झालेला पराभव सर्वांना अनपेक्षित होता. चांगले व क्रिएटिव्ह काम करणारा म्हणून माणूस म्हणून फलटण भर दादासाहेब चोरमले यांचे नाव सर्वत्र घेतले जात होते.

मात्र निवडणुकीमध्ये नेमके काय झाले व कधी काय होईल हे सांगता येत नाही.आज कालच्या निवडणुका या वेगळ्या पातळीवर जाऊन लढल्या जावू लागल्या आहेत. फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रामुख्याने धनशक्तीचा वापर ही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले. आता निवडणुकीत काम करणाऱ्या माणसांची किंमत राहिली नसून जो कोणी निवडणूक काळात जास्त मताचा रेट काढेल त्याच्याच मागे जनता देखील जावू लागली आहे. भविष्यात काम करणाऱ्यांनी निवडणूक लढवायची की, नाही असाही मोठा प्रश्न उभा राहिला असून ज्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती त्यांनीच फक्त निवडणुका लढवायच्या की काय असाही सूर काही लोकांच्या मधून ऐकावयास मिळत आहे. पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा हे समीकरण आता सर्वत्र रूढ होऊ लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

खरंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी झोपडी मध्ये राहणाऱ्या गरिबाला एका मताचा व या देशातील टाटा, बिर्ला आदानी व अंबानी यांना देखील एकाच मताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आता असे वाटू लागली आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचाराचाच जणू काही पराभव होत आहे की, काय परंतु हे समीकरण मात्र निश्चितच भारतीय लोकशाहीला घातक ठरणारे असून लोकशाहीचा ऱ्हास करणारे ठरू पाहत आहे हे तितकेच खोरे आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!