आपला जिल्हा

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

अल्पसंख्यांक महादेव कोळी समाजाला संधी मिळावी समाजाची आग्रही भूमिका

(जावली /अजिंक्य आढाव): सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी अशी मागणी नुकतीच सौ.पायल अमोल पवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

 

राजे गटाच्या सांगवी गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज अनंत मंगल कार्यालय येथे पार पडल्या आहेत.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार दीपक चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विराजभय्या खराडे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी टाकळवाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल पवार यांच्या पत्नी सौ.पायल अमोल पवार यांना सांगवी गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी राजे गटाच्या वतीने उमेदवारी मिळावी व गणातील छोट्या गावाचा ही विचार करावा अशी गावातील नेते व कार्यकर्ते यांनी आग्रही मागणी केली आहे.

सौ.पायल पवार या उच्चशिक्षित असून त्यांचे शिवाजी विद्यापीठातून M.A( राज्यशास्त्र) शिक्षण झाले आहे.त्यांचे पती प्रा.अमोल पवार यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. गावातील व पंचक्रोशीतील अनेक निराधार विधवा , परितक्त्या महिला यांना त्यांनी शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. पंचायत समितीमधील विविध शासकीय योजना उदा. मागासवर्गीय मुलींना सायकली मिळवून दिल्या आहेत. गावातील तरुणांना पशू संवर्धन विभागातून शेळी, कुकुट पालन योजना प्रकरणे लाभ मिळवून दिले आहेत. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना योजनेचे लाभ मिळवून दिले आहेत.बांधकाम कामगार योजना लाभ, गरजू लोकांचे रेशनिंगचे धान्य लाभ सुरू केले आहेत. अशा विविध योजनेचे लाभ गरजू महिलांना, तरुणांना मिळवून दिले आहेत.पंचक्रोशीत त्यांचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.

– प्रा.अमोल पवार हे अल्पसंख्यांक महादेव कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असून समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवत असतात. महादेव कोळी समाजाची लोकसंख्या ही सांगवी गणातील टाकळवाडे, सांगवी, राजाळे, सोनगाव, सोमंथळी या गावात आहे. समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे लाभ मिळवून दिले आहेत. समाजाच्या जातीच्या दाखल्याचे प्रश्न ते शासन दरबारी मांडत असतात.याअल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षित युवा सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल पवार यांच्या उच्चशिक्षित पत्नी सौ.पायल अमोल पवार यांना सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी अशी नेते मंडळी व महादेव कोळी समाजाच्या वतीने आग्रही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!