(फलटण/ प्रतिनिधी)2025 रोजी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव आयोजित बाराव्या खुला युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थ्यांनी तीन कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करून घवघवीत यश संपादन केले व प्रेक्षकांची मने जिंकली. पथनाट्य कलाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवून 11000 रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला . लाईव्ह लोकनृत्य स्पर्धाप्रकारात धनगरी गजी लोकनृत्य सादरीकरण करून द्वितीय क्रमांक क्रमांक 12000 रोख रक्कम व स्मृतिचिन्ह तसेच लोकनृत्य रेकॉर्डिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील कोळी लोकनृत्या स द्वितीय क्रमांक रोख रक्कम 6000 व आकर्षक चषक पटकावला व युवा महोत्सवात बाजी मारली.
या विद्यार्थ्यांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. प्रियंका देशमुख , प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा. सचिन दोशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .कलाकार विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रो. डॉ . पी . एच . कदम सरांच्या शुभहस्ते अभिनंदन करण्यात आले . IQAC समनव्यक प्रो . टी. पी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . सत्कारसमारंभप्रसंगी सर्व वि भागप्रमुख तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. ज्योत्स्ना बोराटे, प्रा. डॉ . सविता नाईक निंबाळकर , फातिमा तांबोळी उपस्तिथ होते.
या स्पृहणीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा . श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौनसिलिंग चेअरमन मा . श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच प्रशासन अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम सरांनी यशस्वी विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.