आपला जिल्हा

जावलसिद्धनाथ जन्मकाळ उत्साहात साजरा ; उद्या काल्याचे किर्तन, महाप्रसादाचे आयोजन

(जावली/ अजिंक्य आढाव)- जावल सिद्धनाथ यांच्या जन्मकाळा निमित्ताने जावली ता फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या ३६ वर्षी अखंड पणे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह व पारायण वाचन सोहळा सुरू असुन मोठ्या संख्येने रोज सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाचन, प्रवचन, किर्तन संध्याकाळी महाप्रसाद संपूर्ण गावातील नागरिकांना देण्यात येतो. गेल्या सहा दिवसांपासून पूर्ण करत आज जन्मकाळ रात्री १२ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

जन्मोत्सव निमित्ताने जावली परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात,त्या बरोबरच गावातील मंडळी दिवसभर या निमित्ताने उपवास करतात.

काल्याचे महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध किर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज झागडे,आळंदी यांच्या होणार आहे.महाभोजन कै.सोमा धोंडी बरकडे यांच्या स्मरणार्थ बरकडे परिवाराच्या वतीने देण्यात येणारा आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!