आपला जिल्हा
सातारा जि.प. समाज कल्याण सभापती पदासाठी सौ. वैशाली कांबळे यांच्या नावाची जोरदार मागणी

(जावली / अजिंक्य आढाव) – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बरड जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार सौ वैशाली संदीप कांबळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना समाज कल्याण सभापती पदा साठी संधी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सौ वैशाली कांबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असून त्यांना समाजसेवेची विशेष आवड आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.एस्सी., एम.एड., डी.एस.एम. असे उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजी राजे महाविद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कोविड काळात त्यांनी १६० कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. गरीब व गरजू रुग्णांना स्वखर्चातून उपचारासाठी मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिला सबलीकरणासाठी महिला मेळावे तसेच वधू-वर मेळावे आयोजित करून त्यांनी समाजकार्याची ठोस छाप निर्माण केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० ते ३५ हजार रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देत त्यांनी तरुणांना सक्षम करण्याचे कार्य केले.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार, कर्नाटक राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका प्रेरणा पुरस्कार तसेच इतर अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा , महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी. आमदार दीपक चव्हाण, श्री शरद कणसे संपर्कप्रमुख सातारा जिल्हा, श्री चंद्रकांत जाधव जिल्हा शिवसेनाप्रमुख, श्री रंजीत भोसले जिल्हा शिवसेना प्रमुख, श्री विराज खराडे संपर्कप्रमुख जिल्हा, श्री नानासाहेब इवरे तालुका प्रमुख शिवसेना, श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर माजी सभापती, सौ श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, श्री भोजराज नाईक निंबाळकर, श्री मेघराज नाईक निंबाळकर, श्री शंभूराजे नाईक निंबाळकर, श्री वामनराव यादव माजी पंचायत समिती सदस्य, श्री दत्तात्रय शिंदे संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्री धनंजय कदम चेअरमन निंबळक विविध कार्यकारी सोसायटी, श्री दादासाहेब कापसे माजी चेअरमन, श्री धनंजय पवार चेअरमन फलटण दूध संघ, श्री मारुती सांगळे संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्री जयकुमार इंगळे सरपंच राजुरी व जिल्हा अध्यक्ष युवक , श्री प्रकाश लंगुटे सरपंच बरड, श्री शंभूराज पाटील संचालक कृषी उत्पन्न समिती फलटण, श्री बाबा बरकडे, श्री रंणजीत सोनवलकर, श्री अक्षय सोनवलकर, श्री नानासाहेब काळुखे, श्री महेश सोनवलकर, एडवोकेट अक्षय सोनवलकर, श्री चव्हाण,श्री शामराव चव्हाण, श्री अमोल शिंदे सरपंच, श्री राहुल इवरे, श्री कल्याण इवले, श्री हनुमंत गायकवाड, श्री रवींद्र भोसले उपसरपंच, श्री दशरथ सूळ, अक्षय सुळ इत्यादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीमध्ये सहकार्य करण्यात आले



