ताज्या घडामोडी

फलटण तालुक्यातील सोमंथळी गावचे 14 युवकांची भारतीय सैन्य दलात निवड

(आसू /आनंद पवार)- फलटण तालुक्यातील सोमंथळी गावची अभिमानास्पद बाब म्हणजे 14 युवकांनी अहोरात्र मेहनत करून भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करत गावातील तरुणांना पुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

ध्येय करिअर अकॅडमीच्या रोहित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले भरतीचे धडेगीरवत देश सेवेचे स्वप्न पूर्ण केले आहेत.सोमंथळी च्या ध्येय करिअर अकॅडमी ने देशसेवा करण्यासाठी विद्यार्थी घडवण्याचे काम केले. सत्कार आयोजित कार्यक्रमा दरम्यान ध्येय करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक रोहित यादव यांचा सन्मान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने करण्यात आला.या वेळी वस्ताद संदीप शेंडगे, पत्रकार आनंद पवार आसू उपस्थित होते
शेतकऱ्यांची पोर व त्या पोरांनी देसवेमध्ये भरती व्हावं हे स्वप्न बाळगणारे ध्येय करिअर अकॅडमी चे रोहित यादव होय सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना देश सेवेमध्ये भरती करण्याचे काम ध्येय करिअर अकॅडमी ने केले असल्याचे मत वस्ताद संदीप शेंडगे यांनी केले.
अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी व बैलगाडी मालकांच्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरातील मुलांना अल्प दरामध्ये ध्येय करिअर अकॅडमी कार्यरत आहे नुकताच आर्मी भरती चा निकाल लागला असून त्यामध्ये सोमंथळी तालुका फलटण यांनी आर्मी भरती मध्ये धीरज बोडरे ,मयूर पवार ,आर्यन कदम, आयुष देवर्षी ,सायरस पाटील, वैष्णव राजगे, तेजस चव्हाण, वैभव सपकाळ ,साहिल खोत, संकेत जेडगे ,अभय निकम, शिवराज माने ,ऋषिकेश नाळे, महेश बाड या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आर्मी भरती मध्ये घवघवीत यश मिळवले. त्याबद्दल ध्येय करिअर अकॅडमीचे रोहित यादव ,अजित तरटे, संकेत भंडलकर, समाधान तांबे, सचिन डांगे या तज्ञ शिक्षकांचा सन्मान व कौतुक अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी बोलताना अँड.किशोर शिंदे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुलांनी टिकणे काळाची गरज आहे मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हेही महत्त्वाचे आहे आज सोमंथळी सारख्या ग्रामीण भागात स्वतः रोहित यादव यांनी पोलीस आर्मी व इतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपली मार्गदर्शकांची टीम तयार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने भरतीचे मार्गदर्शन केले जात असून या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेली यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी असून रोहित यादव यांचे देशसेवेतील विद्यार्थी घडवण्यामध्ये मोलाची भूमिका असल्याचे मत ही यावेळी बोलताना व्यक्त केली.

या कार्यक्रमास अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव बैलगाडी मालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!