आपला जिल्हा

गोतस्करीचा गंभीर प्रकार उघड, भाजपच्या ‘गोरक्षण’ ढोंगावर मोठे प्रश्नचिन्ह

(फलटण /प्रतिनिधी)- फलटण  तालुक्यातील नुकताच धक्कादायक प्रकार समोर आला असून कत्तलखान्यात लहान वासरे कापण्यासाठी नेत असताना सलमान जाकीर कुरेशी हे आढळून आले आहेत.या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे सराईत गोतस्कर असल्याचा आरोप असून, अवघ्या गेल्याच आठवड्यात त्यांच्या काही समर्थकांनी भाजपमध्ये प्रभाक क्रमांक 3 मधून पक्षप्रवेश केला होता.पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळताना दिसत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भाजपामध्ये या आणि कोणतेही गुन्हे करा ते गुन्हे सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना माफ होणार की काय अशीच शंका सर्वसामान्य गोरक्षक व जनतेतून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे भाजप स्वतःला गोरक्षक गोरक्षकांचा पक्ष म्हणून मिरवीत आहे व रस्त्यावर आंदोलने करतो तसेच भाषणांत गोरक्षणाचे गोडवे गातो आणि दुसरीकडे अशा प्रकारचे गंभीर कारनामे करणाऱ्यांना पाठीशी घालतो हे दुटप्पी धोरण आता जनतेने ओळखले आहे.

जर FIR दाखल होऊनही हे असेच चालणार असेल, तर प्रश्न निर्माण होतो काय भाजपचा झेंडा घेतला की गोतस्करी माफ होते का तसेचपक्षप्रवेश झाल्यामुळे या गुन्हेगारांवर पांघरूण घातल घातले जात आहे अशी ही शंका व्यक्त होत आहे.सदर वासरे राजाळे गो शाळेत संरक्षण व गोपलन करण्यासाठी जमा करण्यात आली आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!