आपला जिल्हा

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड जाहीर

(माण /प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत माण तालुका कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सर्वानुमते बाळासाहेब सरतापे यांची माण तालुका अध्यक्षपदी, अरविंद बनसोडे यांची सरचिटणीसपदी तर सुनील भोसले यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य संघटक (पुणे) व सातारा जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले, राज्य संघटक विजय ओव्हाळ, राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

संघटन अधिक बळकट करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देणे व सामाजिक कार्य प्रभावीपणे राबवणे, हा नव्या कार्यकारणीचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक दादासाहेब भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक बांधणीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना विजय ओव्हाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही मातृसंस्था असून बौद्ध धम्म देशभर पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्राने केले आहे. येणाऱ्या काळात BSI-25 हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याची गरज आहे. तसेच प्रलंबित प्रश्न सनदशीर मार्गाने, एकजुटीने लढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य संस्कार सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी बौद्धाचार्यांची संख्या वाढवणे आणि केवळ विधीपुरते न थांबता धम्म समाजात खोलवर रुजवण्यासाठी काम करण्यावर भर दिला.

कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोहिते, जिल्हा सरचिटणीस सुनिल कदम, संस्कार विभाग उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, हिशोब तपासनीस बाळासाहेब जाधव, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, राज्य हिशोब तपासनीस अरुण गायकवाड, जिल्हा महिला विभागाध्यक्ष सुजाता गायकवाड, फलटण तालुका माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत माण तालुक्यात संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात श्रीमंत भोसले यांनी निवडपत्र वाचन केले, तर जिल्हा सरचिटणीस सुनिल कदम यांनी जुनी कार्यकारणी बरखास्त करून सातारा जिल्हा अध्यक्ष पूर्व अध्यक्ष नानासो मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणीची निवड प्रक्रिया पूर्ण केली. माण तालुक्यात उपासिका शिबीर, समता सैनिक दल व विविध संस्कार शिबिरे राबवण्याचे आव्हान यावेळी देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब गायकवाड राज्य संस्कार सचिव,विजय ओव्हाळ राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य, दादासाहेब भोसले राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, नानासाहेब मोहिते सातारा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष, सुनिल कदम सर जिल्हा सरचिटणीस, सुजाता गायकवाड, जिल्हाध्यक्ष महिला विभाग, संस्कार विभाग उपाध्यक्ष सातारा जिल्हा पूर्व, अविनाश बारसिंग,सातारा जिल्हा पूर्व चे सरचिटणीस सुनिल कदम, शिवाजी सावंत वंचित चे युवराज भोसले, आयु.बाळासाहेब जाधव जिल्ह्याचे हिशोब तपासणीस, माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे, सरचिटणीस श्रीमंत भोसले, सुनिल भोसले, कुमार सरतापे, सोनाजी भोसले, प्रशांत शिंदे, बाळासाहेब भोसले उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!