(जावली /अजिंक्य आढाव ): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून STI (राज्य कर निरीक्षक) या प्रतिष्ठित पदावर निवड झाल्याबद्दल कु. कोमल रविंद्र भोसले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी आयु. बाबासाहेब जगताप सर, आयुनि. पारिजातका बाबासाहेब जगताप मॅडम तसेच BBM परिवाराच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळविलेल्या या यशाबद्दल कोमल भोसले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर, माजी संघटक आयु. आनंद जगताप सर, मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधिकारी आयु. प्रफुल्ल मोरे सर, आयुनि. वर्षा प्रफुल्ल मोरे यांच्यासह भोसले परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कु. कोमल भोसले यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनत, चिकाटी, सातत्य आणि ध्येयवेड्या अभ्यासाचे फलित असून, ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून उच्च ध्येय निश्चित करावे, असा प्रेरणादायी संदेश मिळाला.