(जावली /अजिंक्य आढाव )दुधेबावी, ता. फलटण येथील कु. सुप्रिया संपत आडके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून राज्य कर निरीक्षक (STI) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल दुधेबावी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सुप्रिया आडके यांनी प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा, बोरकरवाडी येथे घेतले. माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूल, तिरकवाडी येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथून बी.टेक. पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी मिळविलेले हे यश उल्लेखनीय मानले जात आहे. त्यांच्या यशाबद्दल कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, डॉ. युवराज एकळ, डॉ. सागर कराडे, कृषी मार्गदर्शक संजय सोनवलकर, दत्तात्रय दडस, भानुदास सोनवलकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस