फलटण (प्रतिनिधी): आजच्या काळात वाढदिवस म्हणजे लाखो रुपयांचा खर्च, भव्य सजावट आणि दिखाऊ कार्यक्रम अशी संकल्पना रूढ होत असताना, विडणी गावचे सुपुत्र, हॉटेल जाईचे सर्वेसर्वा आणि फलटण तालुक्यातील यशस्वी युवा उद्योजक मा. श्री. प्रवीणजी नाळे यांनी आपल्या कन्या अधिरा हिच्या वाढदिवसानिमित्त समाजाला विचारांची आणि संस्कारांची अनमोल भेट देत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर प्रवीण नाळे यांनी हॉटेल जाईला फलटण तालुक्यातील अग्रगण्य, विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड म्हणून यशस्वीपणे उभे केले आहे. आपल्या व्यावसायिक कर्तृत्वातून त्यांनी केवळ स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर विडणी गावाचे नावही सातत्याने उंचावले आहे.
व्यवसायात यशस्वी शिखर गाठल्यानंतरही समाजाने दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य कधीही विसरू नये, या उदात्त भावनेतून त्यांनी “समाजाकडून केवळ मिळवायचेच नसते, तर समाजाचे काहीतरी देणेही लागते,” हा संदेश कृतीतून दिला. याच भावनेतून कन्या अधिराच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी “न समजलेले आई-वडील” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर महाराष्ट्रातील लोकप्रिय, अभ्यासू आणि प्रभावी वक्ते प्रा. मा. श्री. वसंतराव हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक 11वाजती आयोजित केले आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, त्यातून अनेक सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानातून पालकत्व, संस्कार, संवाद, नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आज अनेक ठिकाणी वाढदिवस केवळ मनोरंजन, खर्च आणि दिखाऊपणापुरते मर्यादित राहत आहेत. मात्र समाजाला सकारात्मक विचार, चांगले संस्कार आणि प्रबोधनाची दिशा देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने अनुकरणीय ठरला. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणालाही सामाजिक जबाबदारीची जोड देता येते, याचे जिवंत उदाहरण प्रवीण नाळे यांनी घालून दिले आहे.
प्रवीण नाळे यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ यशस्वी उद्योजकाचे नसून सामाजिक भान जपणाऱ्या जबाबदार नागरिकाचे आहे. व्यवसायातील प्रगती आणि समाजसेवा यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा उपक्रम विडणी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
समाजहिताला प्राधान्य देणारे असे उपक्रम भविष्यातही त्यांच्या हस्ते सातत्याने घडत राहोत आणि त्यांच्या कार्यातून विडणी गाव, फलटण तालुका तसेच संपूर्ण परिसराचा नावलौकिक अधिकाधिक उंचावत राहो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
हॉटेल जाईचे सर्वेसर्वा, विडणी गावाचा अभिमान आणि आदर्श युवा उद्योजक मा. श्री. प्रवीणजी नाळे यांचे या स्तुत्य, समाजहितैषी आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.