(फलटण/ प्रतिनिधी)- गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.
आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये 16 जानेवारी या दिवशी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून उमेदवारी दाखल करण्याची 21 जानेवारी अंतिम तारीख ही राहणार असून उमेदवारी अर्जाची छाननी 22 जानेवारी या दिवशी होणार असून अर्ज माघारी घेण्याची तारीख 27 जानेवारी 2026 ही असणार आहे. चिन्ह वाटप कार्यक्रम 27 जानेवारी रोजी होणार आहे.
तर प्रत्यक्षात जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान 5 फेब्रुवारी या दिवशी होणार असून 7 फेब्रुवारी रोजी 10 वाजले पासून या मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.