आपला जिल्हा

फलटण नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदावरून वादंग : एकला चलो चा नारा..?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला विचारात न घेता केली निवड

(फलटण/ प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषदेमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाली असूननु कताच नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा ही संपन्न करण्यात आला.

पदग्रहण समारंभ कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन्ही पक्षाचे गटनेते पदाची निवड ही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी रोहित नागटिळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सचिन अहिवळे यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतील पदी सचिन अहिवळे यांची निवड करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सह कोणालाही विश्वासात न घेता ही निवड करण्यात आली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावरून तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक राहुल निंबाळकर, नगरसेविका सुपर्णा अहिवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ प्रतिभा ताई शिंदे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती चेतन शिंदे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत गटनेता पदी सचिन अहिवळे यांची निवड कशी करण्यात आली व कोणाला विचारात घेऊन केली गेली.

भविष्यात फलटणच्या राष्ट्रवादीची भाजपा पुढे अशीच फरपट सुरू राहणार काय असाही प्रश्न पदाधिकारी एकमेकांना विचारू लागले आहेत.असे प्रश्न पदाधिकारी एकमेकाला विचारत असतानाच यावर प्रत्येक जण असे म्हणाले की या गोष्टी आम्हाला माहीतच नाही म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता असे निर्णय कोण करीत आहे. याबाबतीत बैठकीमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभा शिंदे यांनी आपले सडेतोड विचार मांडले यावेळी त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आम्ही स्वतंत्र निवडणुका लढण्यास तयार आहोत. नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे काय झाले ते बरोबर झाले नाही आता मात्र या निवडणुकीमध्ये असे एकतर्फी निर्णय आम्ही घेऊ देणार नाही. असा इशाराच जणू काही त्यांनी माजी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व भाजपाला दिला असून आम्ही स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढविण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!