आपला जिल्हा

सत्तेतचा किल्ला यंदा कोण जिंकणार..? श्रीमंत रामराजे निंबाळकर यांचा गड ; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नजर ..!

फलटणच राजकारण नव्या उंबरठ्यावर ; नगरपालिका निवडणुकीत गुंतागुंतीच गणित

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटणच राजकारण नव्या उंबरठ्यावर जाताना दिवसेंदिवस दिसत आहे.मात्र सत्तेच गणित गुंतागुंतीच ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.खरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण अध्याप जाहीर दिसत नाही.एकीकडे खुद्द रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर ठरले होते तर खासदार गटाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर व दिलीप भोसले यांचे नाव पुढे होतोना दिसले.
सध्या तर जनेतेतुन विकास पर्व व्यक्तिमत्त्वाला जाहीर पाठिंबा दिला जाईल बोलले जात आहे.निवडणुक जाहीर झाल्यापासून फलटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.चौका चौकात, गल्लोगल्ली राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात आहेत.पक्षबदलाच्या मालिकेमुळे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांच्या नाराजी मुळे यंदाची नगरपालिका निवडणूक सहज सोपे रणांगण राहणार नाही.अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलली जातं आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे सत्ता यावी यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले व खासदार गट मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणुकी पूर्वीच पक्ष प्रवेश वाढल्यामुळे फलटण निवडणूकीची चांगलीच चर्चा होत आहे.एकी कडे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला गडा मजबूती देत आहेत.तर खासदार गट नव्या रणनितीने पाय रोवत असल्याचे राजकीय विश्लेषक वेधून सांगत आहेत.

गेल्या ३० वर्षीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरूंग लागणार कि सत्ता स्थापन करणार या कडे तालुक्याच लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!