आपला जिल्हा

राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सन 2026 अविष्कार फाऊंडेशन च्या वतीने – सौ वैशाली कांबळे सन्मानित

(जावली/ अजिंक्य आढाव)- सन 2026 यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या अविष्कार फाउंडेशनच्या वतीने सो वैशाली कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.

उपक्रम शिक्षिका म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय ज्युनिअर कॉलेज फलटण येथील गुणवंत शिक्षीका सौ. वैशाली कांबळे यांना ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सुरेश खराते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ.वैशालीताई कांबळे या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सामाजिक कार्यात ही नेहमी अग्रेसर असतात.फलण तालुक्यातील निंबळक व परिसरातील गावमधे महिलांना त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करणे,त्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देणे, विविध शासकीय योजनांचे लाभ विनामूल्य मिळवून देणे अशा स्वरूपाचे काम चालू आहे. त्यांच्या या सर्व शैक्षणिक, सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम,मुख्याध्यापक श्री. काळे, उपमुख्याध्यापक श्री. माडकर , सर्व शिक्षक, शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग, निंबळक गावचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!