(फलटण/प्रतिनिधी) :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथील विकास सेवा सोसायटीच्या सभेत शिवसेना तालुका अध्यक्ष नानासो (पिंटू) इवरे यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी बिनविरोध ठराव मंजूर करण्यात आला.