(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील आणि श्री सिद्धनाथ मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या जावली गावात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अचानक धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली.
श्री सिद्धनाथ मंदिरात दररोज लोकांची असते.शिखर शिंगणापूर रोडवरील फलटण पासून जावली गावात मुख्य बाजार पेठ असल्याने व आठवड्यी बाजार मंगळवारचा असतो यामुळे मोठ्या संख्येने नागरिक येतात परिसरात नागरिकाना सुरक्षित, शुद्ध व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने ही तपासणी केली.
तपासणीदरम्यान दुकानांचे अन्न व्यवसाय परवाने (Food License/FSSAI License) तपासले. तसेच दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेले खाद्यपदार्थ, त्यावरील उत्पादन व मुदत समाप्ती (Expiry Date), साठवणुकीची पद्धत, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन याची बारकाईने पाहणी करण्यात आली.
यावेळी संबंधित दुकानदारांना वैध परवाना अद्ययावत ठेवणे, मुदतबाह्य किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीस न ठेवणे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अन्नभेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक तपासण्या भविष्यातही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी माहिती दिली.
या मुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे