आपला जिल्हा

बरड जिल्हा परिषद गटात राजेगटाकडुन सौ.वैशाली संदीप कांबळे उमेदवारीसाठी अग्रही भूमिका

(जावली/ अजिंक्य आढाव)- बरड जिल्हा परिषद गटातील निंबळक गावातील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांची राजे गटाकडून उमेदवारी साठी मागणी होत आहे. वैशाली कांबळे या उच्चशिक्षित असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर त्याबरोबरच अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त आहे.

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबर राजकीय क्षेत्रातील निंबळक, बरड जावली, आंदरूड, गुणवरे, नाईकबोंबवाडी ,शेरे शिंदेवाडी, पिंप्रद, मठाचीवाडी, वाजेगाव , टाकळवाडा ,राजाळे,साठे फाटा, मुंजवडी ,कुरवली ,गावातून मदतीचा हात देत समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या महिला सक्षमीकरणा बरोबरच महिला सबलीकरण करणे काळाची गरज असून यामध्ये सौ. वैशाली कांबळे अग्रेसर आहेत. गेली वीस वर्ष राजे गटाचे काम पूर्व भागातील निंबळक व निंबळक परिसरामध्ये येणाऱ्या गावांमध्ये अविरतपणे सुरू आहे. दर रविवारी निंबळक गावामध्ये महिला सक्षमीकरण व सबलीकरण याकरिता कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये महिला सक्षमीकरण व सबलीकरण करत असताना मागेल त्याला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये आरी वर्क, नथ मेकिंग, इंन्टीमेशन ज्वेलरी मेकिंग,विविध प्रकारचे मसाले तयार करणे ,रांगोळी मॅट मेकिंग ,ब्युटी पार्लर ,फॅशन डिझायनिंग विविध प्रकारचे पदार्थ बनवणे अशा प्रकारची ट्रेनिंग दिली जातात.

विविध प्रकारची प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वतः स्वयंरोजगार सुरू केलेला आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी त्याबरोबरच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना , इमारत बांधकाम कामगार योजना, संघटित कामगार योजना, लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत योजना, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, कामगारांकरता मेडिक्लेम योजना, विमा योजना, घरकुल आवास योजना, पशुसंवर्धन खात्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या योजना या सर्व योजनांची माहिती देऊन पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना विनामूल्य विना मोबदला सर्व लाभ मिळवून दिलेले आहेत. महिला व सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या साठी रोजगार निर्मिती करून त्यांना विविध आस्थापनामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता आवश्यक असणारी सर्व प्रकारची पुस्तके विनामूल्य मुलांच्या अभ्यासाकरता उपलब्ध करून दिलेली आहेत. घटस्फोटीत विधवा व परितक्त्या असणाऱ्या महिलांकरता मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले आहे. कोरोना कालावधीमध्ये गरजू लोकांच्या करता अन्नधान्य किट वाटप व औषध किट वाटप करण्यात आले आहे. सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत अन्नधान्य व कपडे इत्यादी

Related Articles

Back to top button
Don`t copy text!