क्रीडा व मनोरंजन

आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

(फलटण / प्रतिनिधी )प्रगत शिक्षण संस्थेच्या मंगळवार पेठ फलटण येथील ‘आपली शाळा, येथील बालवर्गाचं वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत हर्षोल्हासात, आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले. सन २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील या स्नेहसंमेलनात शिशुगट, मधला गट व मोठा गटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्ये, गाणी, नाट्यछटा व विविध सादरीकरणांतून आपल्या कलागुणांचे मनमोहक दर्शन घडवले.

बालआनंदाचा रंगतदार उत्सव

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर “फ्लावर्स डान्स”, “दादाजी की छडी”, “इवले इवले सुख चिमुकले”, “Wheels on the Bus”, “I Am So Happy”, “बम बम बोले” यांसारख्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम बालकांच्या निरागस हसण्यात, टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त आनंदात रंगून गेला.मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.

या स्नेहसंमेलनासाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, संस्थेचे विश्वस्त तथा सचिव व शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, कमला निंबकर बालभवन (प्राथमिक विभाग) यांच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सावंत, बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे तसेच मानद सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठीची संपूर्ण तयारी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिक्षिका व साधन व्यक्ती निलोफर शेख, देवकी जगताप, पल्लवी गाडेकर, योगिता काकडे, सुजाता शिंदे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केली. शिशुगट, मधला गट व मोठा गटातील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन अभिनय, गीते, नृत्य व नाट्य यांची सुयोग्य निवड करण्यात आली होती.

“गगला गगली” नाटिकेला भरभरून दाद विशेषतः “गगला गगली” या नाटिकेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. या नाटिकेला उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सादर केलेल्या नृत्य-नाट्य व अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी यावेळी कमला निंबकर बालभवन येथील बालवाडी प्रमुख व बालशिक्षिका मनीषा जाधव, निशिगंधा झेंडे, अमृता धडंबे, अश्विनी यादव, स्वाती कदम, विना बेंद्रे, नंदिनी लोखंडे, आसमा मणेर, आरती काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

स्मरणात राहणारा आनंदोत्सव एकूणच, बालकांच्या निरागस आनंदाने, सर्जनशीलतेने व कलागुणांनी नटलेले हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा खरा आनंदोत्सव ठरला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!