(आनंद पवार /प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम म्हणून शेतकऱ्यांनसाठी महाविस्तार एआय अँप शासनामार्फत राबविण्यात येत आहे
महाविस्तार ए आय अँप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी सेवारत्न सचिन जाधव यांनी सासकल संख्या ६४४, धुमाळवाडी संख्या ३२९ या गावांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने ॲप डाऊनलोड करून देण्याबाबत प्रचार व प्रसिद्धी त्यांनी केले आहे.
महाविस्तार ए आय ॲप मध्ये असणारे चॅटबोट वरती पीक उत्पादन वाढीसाठी चे प्रश्न विचारून शेतकरी पिकावरील कीड व रोग नियंत्रण, तसेच पीक उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान प्रभावीपणे राबविले आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने सहाय्यक कृषी अधिकारी सासकल कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
यावेळी फलटण तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी,उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.